शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करते. पण रोजच्या आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनीच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. (फोटो सौजन्य – istock)
किडनीमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी नियमित भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचलेले विषारी घटक लघवीमधून बाहेर पडून जाण्यास मदत होते. त्यामुळे नियमित ७ ते ८ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
शरीर डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि किडनी नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते.
सकाळच्या नाश्त्यात नियमित एक सफरचंद खावे. यामध्ये पेक्टिन फायबर असते, जे किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकते. अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्मांनी समृद्ध असलेले सफरचंद शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे.
लसूणमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीर स्वच्छ होते. लसूणमध्ये असलेले अॅलिसिन मूत्रपिंडांना विषमुक्त करते आणि संसर्गापासूनबी बचाव करते. म्हणूनच नियमित एक कच्ची लसूण खावी.
जेवणातील सर्वच पदार्थांमध्ये आल्याचा वापर केला जातो. यामध्ये असलेले जिंजेरॉल आणि शोगाओल मूत्रपिंड स्वच्छ करते. तसेच शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आल्याच्या चहाचे किंवा आल्याच्या पाण्याचे नियमित सेवन करावे.