धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. मानसिक तणाव वाढल्यामुळे शरीराला हानी पोहचते. काम, वैयक्तिक आयुष्य आणि नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण हा ताण जास्त वेळ टिकून राहिल्यामुळे क्रॉनिक स्ट्रेस शरीराला हानी पोहचवतो. शरीरात वाढलेल्या क्रॉनिक हार्मोन्समुळे आरोग्य बिघडते. हा हार्मोन्स शरीरात वाढल्यामुळे रक्तदाब वाढणे, निद्रानाश, सूज येणे, मूड स्विंग आणि वजन वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला क्रॉनिक स्ट्रेस कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेले Stress hormone कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं डार्क चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्हनॉल्स शरीरातील रक्तप्रवाहास चालना देतात. याशिवाय शरीरात सेरोटोनिनची पातळी वाढून मानसिक आरोग्य आणि मूड सुधारतो.
दैनंदिन आहारात सॅल्मन, मॅकरेल, सार्डिन आणि ट्यूना इत्यादी माशांचे सेवन करावे. या माश्यांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली जळजळ कमी होते आणि आरोग्य सुधारते. मेंदूच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आहारात मासे खावेत.
आंबट गोड चवीची ब्लूबेरी मानसिक तणाव कमी करते. याशिवाय ब्लूबेरीमध्ये असलेले विटामिन सी आणि इतर फायटोन्यूट्रिएंट्स कॉर्टिसोल हार्मोन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय अक्रोड खाल्यामुळे शरीराला शांत आणि आरामदायी झोप मिळते. झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी शांत झोप घेणे आवश्यक आहे.
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे दुपारच्या जेवणात नियमित एक वाटीभर दही खावे. दही खाल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते.