पोटाचे आरोग्य कायमच निरोगी असणे अतिशय महत्वाचे आहे. कारण पोट शरीराचा दुसरा मेंदू आहे. मेंदू संपूर्ण शरीराच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो, त्याप्रमाणेच पोट शरीरातील सर्व अवयव निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो. पण बऱ्याचदा आहारात होणाऱ्या बदलांमुळे पोटाचे आरोग्य बिघडून जाते. पोट आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी पदार्थांमुळे आरोग्याला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही पोट आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या मसाल्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
पोटाचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा 'या' मसाल्यांचे सेवन
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म, प्रतिजैविक गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडंट्स पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात.
आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी आल्याचे सेवन करावे. आल्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. त्यामुळे तुम्ही आल्याच्या रसाचे नियमित सेवन करू शकता.
पोटात वाढलेला गॅस किंवा बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी बडीशेप खावी. याशिवाय उपाशी पोटी तुम्ही बडीशेपेच्या पाण्याचे सुद्धा सेवन करू शकता. बडीशेप खाल्यामुळे तोंडातील दुर्गंधी नष्ट होते.
काळीमिरी संपूर्ण शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. काळीमिरीमध्ये असलेले गुणकारी घटक पोटात साचून राहिलेली घाण स्वच्छ करतात आणि शरीर कायमच निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
दाहक-विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध असलेली दालचिनी पचनक्रिया सुधारण्यासाठी गुणकारी ठरते. यामुळे शरीरातील दाह कमी होतो आणि आरोग्य सुधारते.