शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृदय संपूर्ण शरीरात रक्त पुरवठा करण्याचे काम करते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी असणे आवश्यक आहे. दैनंदिन आहारात हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी भाज्या आणि फळांचे सेवन करावे. बाजारात उपलब्ध असलेल्या पिवळ्या भाज्या केवळ डोळ्यांना आकर्षित न करता आरोग्यासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर आहेत. पिवळ्या पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळून येतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊन हृदयाचे कार्य सुरळीत राहते. (फोटो सौजन्य – iStock)
रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेली घाण स्वच्छ होण्यासाठी आहारात करा 'या' भाज्या आणि फळांचे सेवन
भोपळ्याच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. मात्र ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये बीटा-कॅरोटीन, विटामिन सी आणि फायबरचे प्रमाण अधिक आढळून येते.
चवीला आंबट गोड असलेले अननस हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. अननसाचे सेवन केल्यामुळे शरीरात निर्माण झालेल्या रक्ताच्या गुठळ्या पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे अननसाचे नियमित सेवन करावे.
फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा सगळ्यांचं खायला खूप आवडतो. चवीला गोड असलेल्या आंब्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जीवनसत्त्वे अ, क आणि ई याशिवाय पोटॅशियम आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
शिमला मिरची खाणे अनेकांना आवडत नाही. मात्र या भाजीमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी दैनंदिन आहारात पिवळ्या शिमला मिरचीचे सेवन करावे.
बाजारामध्ये केळी सहज उपलब्ध होतात. केळ्यांचे सेवन केल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. दैनंदिन आहारात केळ्यांचे नियमित सेवन केल्यास शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे कार्य सुरळीत चालू राहते.