हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. थंड वातावरणामुळे साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरू लागतात. थंडी जास्त वाजू लागल्यानंतर अनेक लोक शेकोटी किंवा हिटरचा वापर करतात. पण नंतर पुन्हा एकदा थंडी जाणवू लागते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीर आतून उबदार असणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण करण्यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये आहारात बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात ऊबदारपणा टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या भाज्यांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य-istock)
हिवाळ्यात करा भाज्यांचे सेवन
शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर बीटरूट खाण्याचा सल्ला दिला जातो. बीट खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे.
दाहक विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असलेलं आलं अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. आल्याचे नियमित सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. थंडीच्या दिवसांमध्ये आल्याचा चहा बनवून प्यायला जातो.
चवीला गोड असलेली रताळी सगळ्यांचं खूप आवडतात. रताळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर, विटामिन सी, ई इत्यादी अनेक घटक आढळून येतात. तसेच रताळं खाल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते.
हिवाळ्यामध्ये बाजारात गाजर सार्वधिक उपलब्ध असतात. गाजर खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामध्ये आढळून येणारे बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
लसूणमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळून येतात. लसूण खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात लसूणचे सेवन करावे. ज्यामुळे शरीरात उष्णता कायम टिकून राहील.