शेवग्याची पाने, फुले, शेंगा शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. शेवग्याची पाने शरीरासाठी नाहीतर त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. जीवनसत्त्वे अ, क, ई, कॅल्शियम, लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. मोरिंगाच्या पानांपासून बनवलेला चहा हर्बल टी म्हणून ओळखला जातो. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मोरिंगापासून बनवलेल्या चहाचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच शरीराला अनेक प्रभावी फायदे होतील. जाणून घ्या मोरिंगा चहा पिण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
नियमित एक कप मोरिंगा चहाचे सेवन केल्यास शरीरात दिसून येतील बदल

शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मोरिंगाच्या पानांचा चहा बनवून प्यावा. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. तसेच शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मोरिंगाच्या पानांचा चहा प्यावा. यामुळे संपूर्ण डिटॉक्स होण्यास मदत होते. कृत आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यासाठी मोरिंगचा चहा प्यावा.

मोरिंगमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. फायबर युक्त पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे कार्य सुलभ राहते.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी मोरिंगाच्या चहाचे सेवन करणे गुणकारी ठरेल. या चहाचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि शरीराचे चयापचय सुधारते.

मोरिंगमधील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्समुळे उच्च रक्तदाब कायमच नियंत्रणात राहतो. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊन संपूर्ण शरीराला अनेक फायदे होतात.






