तुषार शेलार दिग्दर्शित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटामध्ये, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता ठाकूर अनुप सिंग साकारात असून त्याने विजयदुर्ग गडावर जाऊन महाराजांच्या लूकमध्ये खास फोटोशूट केले आहे.
Thakur Anup Singh Vijaydurga Fort Photos
अभिनेता ठाकूर अनुप सिंगच्या ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या मराठी चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
ठाकूर अनुप सिंग एक प्रसिद्ध अभिनेता असून बॉडीबिल्डिंग क्षेत्रात त्याने स्वत:चे नाव लौकिक केले आहे. अनुपने काही तासांपूर्वीच विजयदुर्ग गडावरील फोटो शेअर केलेले आहेत.
ठाकूर अनुप सिंग या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्याने विजयदुर्ग गडावर सुद्धा संभाजी महाराजांच्या लूकमधीलच फोटोशूट केले आहे.
सध्या सोशल मीडियावर अनुप सिंगचे छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमधील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
धर्म आणि स्वराज्यासाठी समर्पित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची गाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
ठाकूर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, आणि मल्हार मोहिते-पाटील अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.