सध्या सोशल मीडियावर धुरंधर चित्रपटाची हवा आहे. चित्रपट नावाप्रमाणेच धुरंधर ठरला आहे. प्रत्येकाच्या तोंडावर आता अक्षय खन्नाचे कौतुक आहे. अक्षयच्या अभिनयाने सोशल मीडियावर वादळ आले आहे. त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. लोकांनी तर "विलेन कसा असावा?" याचे उत्तम उदाहरण म्हणून रहमान डकैतचे पात्र जाहीर केले आहे.
धुरंदर चित्रपटातील पात्र खऱ्या आयुष्यात! (फोटो सौजन्य - Social Media)

पण तुम्हाला माहित आहे का? हा चित्रपट खऱ्या आयुष्यातील पात्रांपासून प्रेरित आहे. यामध्ये दाखवण्यात आले प्रत्येक पात्र खऱ्या आयुष्यातही हयात होते.

सर्वत्र गाजत असलेले पात्र म्हणजेच अक्षय खन्नाचे "रहमान डकैत" या पात्राचे पूर्ण नाव "सरदार अब्दुल रहमान बलोच" असे आहे. पाकिस्तानच्या ल्यारीमध्ये जन्मलेला हा कुख्यात गँगस्टर होता. पुढे त्याचे संबंध पाकिस्तान पीपल्स पार्टीशीही आले.

संजय दत्तने चौधरी अस्लम नावाचे पात्र साकारले आहे. चौधारी अस्लम पाकिस्तानी पोलीस होता, तसेच एन्काउंटर स्पेशालिस्ट होता.

अर्जुन रामपालने साकारलेले "मेजर इकबाल" हे पात्र एका दहशतवाद्याचे आहे. मुळात, तो दहशतवादी एकदा पाकिस्तानी सैन्यातही होता.

चित्रपटाचे मुख्य पात्र रणवीर सिंह याने भारतीय सैनिक शाहिद मोहित शर्मा यांचे पात्र साकारले आहे अशा चर्चा आहेत तर R माधवन याने अजित डोवाल यांचे पात्र साकारले आहे.






