बदलत्या जीवनशैलीनुसार शरीरावर देखील याचा परिणाम होतो. सध्याच्या घडीला महिला असो की पुरुष अनेक जण काळे ओठ गुलाबी कसे होतील यासाठी प्रयत्न करतात. मार्केटमध्ये गुलाबी ओठांसाठी विविध प्रॉडक्ट आहेत याचा परिणाम पाहिजे तसा होताना दिसत नाही, मग अशा वेळी काय करावं. खरंच काळे ओठ गुलाबी होतात का ? की हा फक्त एक समज आहे, याबाबत जाणून घेऊयात.
सेलिब्रिटींसारखे आपले सुद्धा गुलाबी ओठ असावेत असं प्रत्येकाला वाटतं. मात्र बऱ्याचदा अनेक महागड्या ट्रीटमेंट घेऊनही ओठ गुलाबी होत नाही. याबाबत अनेक कारणं आहेत.
ओठ काळे पडण्याची अनेक कारणं आहेत. बदलत जाणारी लाइफस्टाईल, व्यसनं आणि हार्मोन्स असंतुलित असणं यामुळे ओठ काळे पडतात.
जर तुम्ही स्मोकींग करताय किंवा दारुचं व्यसन आहे तर याचा परिणाम हा ओठांवर होतो.
महिलांना मासिकपाळीचा त्रास असल्य़ास शरीरातील हार्मौन्स असंतुलित होतात. यामुळे देखील ओठ काळे पडतात.
डर्मेटोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार जर व्यसनामुळे ओठ काळे पडले तर निश्चितच ते गुलाबी करता येतात. मात्र पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेण्यापेक्षा तज्त्रांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट करणं फायदेशीर आहे.
डर्मेटोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिकरित्या ओठ काळसर असतील तर ते सहसा गुलाबी होत नाही. जर तुमच्या त्वचेत मेलेलीनचं प्रमाण अधिक असल्यास ओठांचादेखील काळसर रंग असतो.
याच कारणामुळे जर तुम्हालाही गुलाबी रंगाचे ओठ पाहिजे असतील तर तज्ज्ञांच्या सल्ल्लानुसार ओठांची ट्रीटमेंट घ्या.