लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मासे खायला खूप जास्त आवडतात. जेवणाच्या ताटात जर मासे असतील तर चार घास जास्त जातात. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मासे खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. अन्यथा शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते. वातावरणात आर्द्रता आणि तापमानात सतत बदल होत असतात. यामुळे जिवाणू आणि इतर सूक्ष्मजीव झपाट्याने वाढतात.दूषित अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात मासे खरेदी करताना घ्या या गोष्टींची आवश्यक काळजी. (फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात अजिबात खाऊ नका 'या' प्रकारचे मासे, अन्यथा डायरिया होऊन शरीरात वाढेल थकवा- अशक्तपणा

माशांमध्ये प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेले पौष्टिक घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पावसाळ्यात मासे खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी.

मासे बर्फाशिवाय किंवा रेफ्रिजरेशनशिवाय बराच वेळ उघड्यावर ठेवले असतील तर त्यात विषाणू झपाट्याने वाढतात. असे मासे खाल्ल्यामुळे फूड पॉइझनिंग, उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

ताज्या माशांना कधीही कुबट किंवा तीव्र वास येत असेल तर त्यांना अजिबात वास येत नाही. पण माशांचा सडका वास येत असेल किंवा रंग बदलेला वाटत असेल तर माशांची खरेदी करू नये.

पावसाळ्यात कधीही अर्धवट शिजलेले किंवा कच्चे मासे अजिबात खाऊ नयेत. त्यामुळे मासे पूर्णपणे शिजवूनच खावेत. मासे व्यवस्थित शिजवल्यास बहुतेक हानिकारक जिवाणू आणि परजीवी नष्ट होतात.

बराच वेळ फ्रिजरमध्ये ठेवलेले किंवा बर्फाच्या बॉक्समध्ये ठेवलेले मासे अजिबात खाऊ नये. यामुळे माशांमधील आवश्यक घटक नष्ट होऊन जातात.






