हल्ली सर्वच मुली लग्नाच्या ब्लाऊजवर आरी वर्क करून घेतात. बारीक मणी, मोती किंवा डायमंड लावून आरी वर्क केले जाते. मात्र नऊवारी किंवा रिसेप्शनच्या साडीवरील ब्लाऊज आणखीनच उठावदार आणि सुंदर करण्यासाठी मशीन वर्क करून ब्लाऊजवर बारीक बारीक बुट्या किंवा लेस लावून घेतली जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला लग्नात स्टायलिश आणि मराठमोळा मॉर्डन लुक दिसण्यासाठी ब्लाऊजच्या मागील गळ्यावर आरी वर्क करण्यासाठी काही हटके डिझाईन्स सांगणार आहोत. या डिझाईन रॉयल लुक देतात. साध्या साडीला हटके लुक देण्यासाठी या डिझाईन नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नातील ब्लाऊजच्या मागील गळ्याला करा 'या' डिझाईनचे customised आरी वर्क

हल्ली नवरा नवरीचे नाव सुद्धा ब्लाऊजच्या मागील गळ्याला शिवून घेतले जाते. त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला नवरा- नवरीचे नाव लिहून घेऊ शकता.

काहींना नऊवारी साडीवरील ब्लाऊज जास्त हेवी डिझाईन केलेला हवा असतो. अशावेळी तुम्ही ब्लाऊजवर मोर किंवा इतर कोणत्याही डिझाईन करू शकता.

कोणत्याही साडीवर पैठणी बोट नेक ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतो. बंद गळ्याचे स्टायलिश ब्लाऊज कोणत्याही साडीवर घातल्यास लुक हटके दिसेल.

फॅशनच्या जमान्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी सतत बदलत असतात. त्यामुळे ब्लाऊजवर नवरानवरीचे फोटो किंवा इतर कोणतीही सुंदर हॅन्ड पेंटींग काढून ब्लाऊज आणखीनच आकर्षक बनवू शकता.

ब्लाऊजच्या मागील गळ्याला तुम्ही डोली असलेले पॅच वर्क करून घेऊ शकता. हा ब्लाऊज लग्नाच्या पिवळ्या साडीवर अतिशय सुंदर दिसेल.






