पूर्वीचा काळी राजघराण्यांमधील स्त्रिया आनंदाच्या क्षणी पैठणी साडी नेसण्यास प्राधान्य देत होत्या. साडीवरील सोन्याची नक्षीकाम आणि रेशमी धाग्यांनी केलेले विणकाम सगळ्यांचं आकर्षित करते. पैठणी साडी जगभरात सगळीकडे फेमस आहे. महाराष्ट्रातील सर्वच महिलांना पैठणी साडी नेसायला आवडते.साडीवर तयार करण्यात आलेले मोर, बारीक नक्षीकाम, रंग आणि धाग्यांची विणकाम महिलांना आकर्षित करते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पैठणी साडीचे काही सुंदर प्रकार सांगणार आहोत. बदलत्या फॅशन आणि ट्रेंडनुसार सगळीकडे डिझायनर साड्यांप्रमाणे पैठणी साडीमधील काही नवनवीन रंग, वेगवेगळ्या डिझाइन्स ट्रेंडमध्ये आल्या आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
'महाराष्ट्राचे महावस्त्र' पैठणी साडीचे प्रकार माहीत आहेत का?
महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात महिला सणावाराच्या दिवसांमध्ये पैठणी साडी नेसण्यास प्राधान्य देतात. त्यातील पैठणी साडीचा पहिला प्रकार म्हणजे कलांजली पैठणी साडी. ही साडी गुणवत्ता आणि अस्सलतेमुळे सगळीकडे फेमस आहे.
हातमागावर विणण्यात आलेली मुनिया पैठणी साडी तिच्या बारीक आणि लहान बॉर्डरमुळे ओळखली जाते. काठांवर आणि पदरावर बारीक विणलेले पोपटाचे नक्षीकाम सगळ्यांचं खूप जास्त आवडते.
भरजरी आणि बारीक नक्षीकाम, मोठ्या बॉर्डरची शिवशाही पैठणी साडी प्रत्येक महिलेच्या कपाटात पाहायला मिळेल. ही साडी कुशल कारागीर अत्यंत बारीक नक्षीकाम करून तयार करतात.
हल्ली चंद्रकोर पैठणी साडीची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. साडीच्या आतमध्ये सोन्याच्या जरीचे नक्षीकाम करत चंद्रकोर तयार केली जाते. ही चंद्रकोर साडीच्या पदरावर सुद्धा अतिशय सुंदर दिसते.
नारायण पेठ साडी तिच्या खास पदरामुळे ओळखली जाते. नारायण पेठ साडीमध्ये अनेक वेगवेगळे रंग उपलब्ध आहेत.