दैनंदिन आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे सेवन केले जाते. भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. त्यातील अनेकांना न आवडणारी भाजी म्हणजे कोबी. कोबीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर अनेक लोक मुरडतात. पण कोबीची भाजी खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कोबीच्या भाजीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कोबीची भाजी चवीला अतिशय पांचट लागते. त्यामुळे कोबीची भाजीपासून तुम्ही हे काही टस्टाईल आणि सात्विक पदार्थ घरात बनवू शकता. जाणून घ्या सविस्तर.(फोटो सौजन्य: Pinterest)
कोबीची भाजी खायला आवडत नाही? मग कोबीपासून घरीच बनवा 'हे' स्ट्रीटस्टाईल आणि सात्विक पदार्थ
कोबीची भाजी बारीक चिरून त्यात हिरवी मिरची आणि इतर फोडणीचे पदार्थ टाकून बनवलेली भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.
सकाळच्या नाश्त्यात कायमच आलू पराठा किंवा मिक्स भाज्यांचा पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही कोबीचा पराठा बनवू शकता. कोबी बारीक किसून त्यात वेगवेगळे मसाले टाकून बनवलेला पराठा चवीला अतिशय सुंदर लागतो.
हिरवी चटणी, खोबऱ्याची चटणी, पुदिन्याची चटणी इत्यादी प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात.पण पराठ्यासोबत खाण्यासाठी तुम्ही कोबीची चटणी बनवू शकता.
कोबीच्या भाजीपासून कुरकुरीत कांदा कोबीची भाजी बनवली जाते. पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात भजी अतिशय सुंदर लागते. कोबीची भजी तुम्ही सॉससोबत सुद्धा खाऊ शकता.
मिक्स भाज्या आणि कोबी टाकून बनवलेले सॅलड चविष्ट लागते. वाढलेले वजन कमी करताना आहारात वेगवेगळ्या सॅलडचे सेवन केले जाते. त्यामुळे तुम्ही कोबीचे सॅलड बनवू शकता.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडणारा पदार्थ कोबी मंच्युरीयन. स्ट्रीटवर मिळणारे कोबी मंच्युरीयन सगळ्यांचं आवडतात. हा पदार्थ बनवताना मैद्याचा कमी वापर करावा.