10 ते 15 मीटर उंच लाटा, आयुष्यात कधीही न अनुभवलेली वाऱ्याची गती आणि समुद्राच्या लाटांवर डोलणारी नौका! ज्यामध्ये आपण बसलोय खरं पण आपल्याला सतत मृत्यूचे दर्शन होत आहे. असा प्रसंग अनुभवायचा असेल तर तुम्ही Drake Passange चा थरार नक्कीच अनुभवला पाहिजे. पण नक्की कसे?
Drake Passange म्हणजे काय? (फोटो सौजन्य - Social Media)

तुम्हाला आजही हा थरार अनुभवण्याची इच्छा आहे तर एक लक्षात घ्या, येथे जाणे म्हणजे यमाच्या दारात घुसून यमालाच हुलकावण्या देणे. ड्रेक passage अमेरिकेचे दक्षिण टोक (केप हॉर्न) आणि अंटार्क्टिकाच्या दक्षिण शेटलँड बेटांच्या दरम्यान असलेला पाण्याचा भाग आहे.

या भागात प्रवास करताना येथे ६० ते ८० फूट उंचीच्या लाटांना सामोरे जावे लागते. कधी कधी याहूनही मोठ्या लाटा येथे येतात. त्यातून जहाजांना मृत्यूशी झुंज द्यावी लागते.

ड्रेक पॅसेज हे समुद्र आहे जे कधी शांत नसते. त्यामुळे या जागेला Drake Shake ही म्हणतात पण क्वचित शांत असणाऱ्या या जागेला शांत अवस्थेत Drake Lake असे म्हंटले जाते.

शॅकल्टनच्या घटनेत डिड वर्ष अंटार्टिकाच्या Elephant बेटावर थरार अनुभवल्यानंतर त्याने याच भागातून दक्षिण जॉर्जियाकडे बोट वळवली होती.

या मार्गाची विशेष बाब म्हणजे सर फ्रांसिस्क ड्रेकने या मार्गाचा वापर कधीच नाही तरी या मार्गाला ड्रेकचे नाव देण्यात आले आणि 'Drake पॅसेज' म्हणून ओळखवण्यात आले.






