दिवाळी सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. घराच्या अंगणात सुंदर सुंदर रांगोळी काढून दिव्यांची आरास केली जाते. पूर्वीच्या काळापासून आत्तापर्यंत सगळीकडे सणावाराच्या दिवसांमध्ये रांगोळी काढली जाते. दिवाळी उत्सवात रांगोळीला खूप जास्त महत्व आहे. पण बऱ्याचदा घाईगडबीमध्ये रांगोळीच्या डिझाईन पाहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवाळीनिमित्त अंगणात काढण्यासाठी सुंदर आणि आकर्षक डिझाईनची रांगोळी काढण्यासाठी काही सोप्या डिझाईन सांगणार आहोत. या डिझाईन रांगोळी अंगणाची शोभा वाढवतील. (फोटो सौजन्य – pinterest)
दिवाळीनिमित्त अंगणात काढा 'या' डिझाईनची आकर्षक रांगोळी
दिव्यांची आरास करून काढलेली रांगोळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अतिशय सुंदर दिसेल. बाजारात मेणाचे किंवा पाण्यावरील दिवे उपलब्ध आहेत. या दिव्यांचा वापर करून तुम्ही आकर्षक रांगोळी काढू शकता.
मोराच्या डिझाईनची रांगोळी अंगणाची शोभा वाढवते. त्यामुळे या डिझाईनची मोराची रांगोळी तुम्ही सहज काढू शकता. ही रांगोळी काढताना वेगवेगळ्या रंगाचा वापर केल्यास रांगोळी अतिशय सुंदर दिसेल.
सणावाराच्या दिवसांमध्ये घरात मोठ्या प्रमाणावर फुले आणली जाते. देवपूजा झाल्यानंतर फुलांचं नेमकं काय करावं असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. अशावेळी तुम्ही फुलांचा वापर करून सुंदर रांगोळी काढू शकता.
अंगणाचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही संस्कार भारती रांगोळी काढू शकता. संस्कार भारती रांगोळी काढताना वेगवेगळ्या रंगाचा वापर करून नंतर पांढऱ्या रांगोळीने सुंदर डिझाईन काढली जाते.
काहींना खूप मिनिमल रांगोळी काढायला खूप जास्त आवडते. मिनिमल रांगोळी काढण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. वेगवेगळे रंग आणि फुलांचा वापर करून तुम्ही ही रांगोळी काढू शकता.