लग्न, घरातील कार्यक्रम आणि सणावाराच्या दिवसांमध्ये सर्वच महिला नवीन साड्या खरेदी करतात. साडी घेतल्यानंतर त्यावर नेमकं कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घ्यावा? हे काहीवेळा सुचत नाही. हल्ली कांजीवरम आणि पैठणी साड्यांवरील ब्लाऊज उठावदार आणि स्टायलिश दिसण्यासाठी आरी वर्क किंवा बारीक सोनेरी मण्यांचे वर्क करून घेतले जाते. आरी वर्क केल्यामुळे अतिशय साधा ब्लाऊज खूप भरीव आणि सुंदर दिसतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लग्नात रॉयल आणि रिच लुक करण्यासाठी आरी वर्कच्या काही लेटेस्ट डिझाईन दाखवणार आहोत. या डिझाईन कोणत्याही ब्लाऊजवर अतिशय सुंदर दिसेल. (फोटो सौजन्य – pinterest)

ब्लाऊजच्या पुढील आणि मागील गळ्याला या पद्धतीने मण्यांचे आरी वर्क करून घेऊ शकता. सोनेरी काठ असलेल्या ब्लाऊजच्या काठावर सोनेरी आणि वेगवेगळ्या आकर्षक मण्यांचे आरी वर्क उठावदार दिसते.

टेम्पल दागिन्यांप्रमाणे ब्लाऊजवर सुद्धा टेम्पल डिझाईन आरी वर्क करून घेऊ शकता. कांजीवरम साडीवरील ब्लाऊजवर तुम्ही या डिझाईनचे आरी वर्क करू शकता.

पैठणी साडीवरील ब्लाऊजवर तुम्ही मोराचे पॅच किंवा हाताने केलेले मोराचे आरी वर्क करून घेऊ शकता. यामुळे तुमच्या ब्लाऊजला रॉयल लुक येईल.

काहींना नऊवारी साडीवरील ब्लाऊज खूप डिझाईन केलेले हवे असतात. अशावेळी तुम्ही या डिझाईनचे आरी वर्क करून घेऊ शकता.

काहींना खूप साधा आणि सिंपल डिझाईन केलेला ब्लाऊज हवा असतो. अशावेळी तुम्ही या डिझाईनचे ब्लाऊज कस्टमाइज करून घेऊ शकता.






