महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळख असलेली पैठणी साडी जगभरात फेमस आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा घरातील कोणत्याही कार्यक्रमात महिला पैठणी साडी नेसताना. पैठणी साडीवर असलेले आकर्षक मोर, रेशमी धाग्यांचा वापर करून विणलेली पैठणी साडी, बारीक बुट्यांचे काम इत्यादी अनेक गोष्टी साडी खरेदी करण्यास भाग पडतात. लग्नात आणखीनच सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी तुम्ही या ट्रेंडींग रंगाच्या पैठणी साडी खरेदी करू शकता. लग्न समारंभात पैठणी साडी महिलांच्या सौंदर्यात भर पडते. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नासाठी पैठणी साडी खरेदी करताय? सध्या ट्रेंडींगला आहेत पैठणी साडीचे 'हे' रंग, नेसल्यावर दिसतील आकर्षक

हिरव्या रंगाची पैठणी साडी सध्या ट्रेंडींगला आहे. साखरपुडा, हळदी समारंभ किंवा लग्नातील इतर कार्यक्रमांमध्ये तुम्ही हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसू शकता.

बाजारात रॉयल ब्लु रंगाच्या पैठणी साडीला खूप जास्त मागणी आहे. निळ्या रंगाची पैठणी तुम्ही कोणत्याही कॉन्ट्रास्ट ब्लाऊजवर स्टाईल करू शकता.

लाल रंग सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. लाल रंगाच्या साडीवर तुम्ही हिरव्या रंगाचा किंवा पैठणी साडीला मॅच होईल असा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. लाल रंगाच्या साडीमध्ये रॉयल लुक दिसतो.

जांभळा रंग सर्वच त्वचा प्रकारावर अतिशय सुंदर दिसतो. लग्नात जांभळ्या रंगाच्या पैठणी साडीवरील लुक आणखीनच सुंदर करण्यासाठी सोन्याचे किंवा मोत्याचे दागिने तुम्ही घालू शकता.

काहींना फिकट रंगाची पैठणी साडी नेसायला खूप जास्त आवडते. त्यामुळे तुम्ही बेबी पिंक किंवा इतर वेगवेगळ्या रंगाची निवड करू शकता.






