पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठया प्रमाणावर पसरतात. या आजारांची लागण शरीराला झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. यामुळे सतत चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे किंवा इतरही आजार होण्याची शक्यता असते. आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर नियमित दुधाचा चहा किंवा ग्रीन टी पिण्याची सवय असते. पण सतत ग्रीन टी चे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित ब्लु टी चे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला ब्लु टी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी नियमित प्या Blue Tea
ब्लू टीमध्ये बायोफ्लेव्होनॉइड नावाचे घटक आढळून येते, ज्यामुळे शरीराला संरक्षणात्मक अँटिऑक्सिडंट्स मिळतात. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर सकाळच्या वेळी ब्लु टी पिणे अतिशय उत्तम आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. मधुमेह झाल्यानंतर चहाचे जास्त सेवन करू नये.
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ब्लु टी चे सेवन करावे. यामुळे शरीराला आवश्यक घटक मिळतात. शरीरात कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी ब्लु टी मदत करते.
अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली ब्लु टी केवळ शरीरासाठीच नाहीतर त्वचा आणि केसांसाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. यामुळे त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी मदत होते.
वाढलेले वजन कमी करताना सकाळी उठल्यानंतर गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेला ब्लु टी प्यावा. हा चहा शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी मदत करतो.