वजन कमी करताना फळ आणि हिरव्या भाजीपाल्याचा रस फार फायद्याचा ठरतो. अनेक जण या रसांना आपल्या सेवनात प्रामुख्यानं घेतात आणि त्यांच्या डाईटला परिपक्व करत, वजन कमी करण्यात यश मिळवतात. हे फळांचे रस नियमित प्रमाणात सेवन केल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतात, मात्र त्यासोबत संतुलित आहार आणि व्यायाम महत्त्वाचा आहे.
या फळांच्या रसाचे सेवन करा आणि नियमित व्यायामही करत चला. (फोटो सौजन्य - Social Media)
गाजरात कमी कॅलरीज आणि भरपूर फायबर असते, जे पचनक्रिया सुधारते आणि पोट भरल्याची भावना देते. त्यामुळे गाजराचा रस पित चला.
कलिंगडाचा रसही फायद्याचा ठरतो. कलिंगडामध्ये 90% पाणी असते आणि कमी कॅलरीज असतात, त्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
डाळिंबाचा रस प्या आणि त्यापासून होणारे फायदे एकदा अनुभवाचं. डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स चरबी विरघळवण्यात मदत करतात आणि शरीराला डिटॉक्स करतात.
लिंबात व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते, जे चयापचय वाढवते आणि चरबी कमी करण्यास सहाय्य करते. त्यामुळे दररोज किमान एक ग्लास लिंबाच्या रसाचे सेवन करा.
अननसाचा रस पिल्याने फायदे हमखास दिसून येतात. अननसातील ब्रोमेलिन एन्झाइम चरबी वितळवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतो.