शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटात विषारी घटक आणि घाण तशीच साचून राहते, ज्यामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे पोट खराब होणे, पोट फुगणे किंवा पोटाच्या समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये चिटकून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या ज्यूसचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
आतड्यांमध्ये चिकटलेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी प्या 'हे' ज्यूस
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित अननसाचा रस प्यावा. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, फायबर इत्यादी घटकांमुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते.
मागील अनेक वर्षांपासून कोरफडचा वापर आरोग्यासंबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केला जात आहे. कोरफडमध्ये असलेले गुणधर्म पोट आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात.
सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. सफरचंदमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात.
आरोग्यासाठी सगळ्यात प्रभावी ठरणारे पेय म्हणजे पालक रस. सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास पालक स्मूदी किंवा पालकचा रस प्यावा. यामध्ये विटामिन ए, विटामिन बी 9, विटामिन सी, के 1, आयर्न आणि पोटॅशियम इत्यादी घटक असतात.
सायलियममध्ये विटामिन बी१२, झिंक, लोह, मॅग्नेशियम आणि तांबे इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर सायलियममध्ये लिंबाचा रस मिक्स करून प्यावे. यामुळे पोटातील घाण स्वच्छ होईल.