आज प्राख्यात इतिहासकार बिपन चंद्र यांची पुण्यतिथी. १९२८ मध्ये हिमाचल प्रदेशातील कांगाड येथे त्यांचा जन्म झाला होता. बिपन चंद्र भारतीय स्वातंत्र्य चवळीचे अभ्यासक होते. त्यांनी लाहोरच्या फोरनमन ख्रिश्चन कॉलेज व अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळ आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर मार्क्सवादी दृष्टीकोनातून लिखाण केले. यासंदर्भात त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली. यामध्ये हिस्टरी ऑफ मॉडर्न इंडिया, मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया फ्रॉम मार्क्स टू गांधी आणि द राईज अँड ग्रोथ ऑफ इकॉनॉमिक नॅशनलिझम इन इंडिया अशी उल्लेखनीय पुस्तके लिहीली आहे.