पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मशरूम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ही भाजी अतिशय आवडीने खाल्ली जाते. ऑयस्टर, व्हाईट बटन आणि शिताके मशरूम इत्यादी अनेक वेगवेगळे मशरूमचे प्रकार आहेत. रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मशरूमचे सेवन करावे. याशिवाय दैनंदिन आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी आहारात मशरूम खावेत. आज आम्ही तुम्हाला मशरूम खाल्यामुळे शरीराला नेमके कोणते फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
मधुमेह आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा मिल्की मशरूमचे सेवन
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले मशरूम शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे आहारात कायमच मशरूमचे सेवन करावे. यामध्ये असलेले फायबर आणि बायोएक्टिव्ह संयुगे रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात.
विटामिन सी युक्त मशरूमचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारते. मिल्की मशरूम शरीरासाठी अतिशय गुणकारी आहेत. यामध्ये असलेले आवश्यक घटक शरीर आणि त्वचा निरोगी ठेवतात.
मशरूममध्ये कमी कॅलरीज आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मशरूमचे आहारात सेवन करावे.
मशरूममधील फायबर आणि पोटॅशियम शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढत नाही.
मशरूममधील अँटीऑक्सिडंट्स आणि इतर घटक कर्करोगाच्या पेशींवर नियंत्रण ठेवतात. यामध्ये असलेला कोलीन नावाचा घटक स्मरणशक्ती आणि स्नायूंची क्रियाशीलता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.