भारतीय संस्कृतीत दसऱ्याला फार महत्त्व आहे. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. याला विजयादशमी असे देखील म्हटले जाते. या ह दिवशी आपट्याची पान वाटली जातात. या पानांना सोन म्हणून वाटलं जात. मात्र यानंतर या पानांच काय कराव ते अनेकांना ठाऊक नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, दसऱ्यानंतर या पानांना फेकून न देता तुम्ही यापासून अनेक फायदे मिळवू शकता.
उगाच नाही म्हणत सोनं! दसऱ्यानंतर आपट्याच्या पानांचं काय करावं? जाणून घ्या
अनेकांना वाटते की, या पानांच महत्त्व फक्त दसऱ्याच्या दिवसापुरतेच मर्यादित आहे मात्र असे नाही. या नंतरही तुम्ही आपट्याच्या पानांचा वापर करू शकता
तज्ञांच्या सल्ल्यानुसार, ॲसिडीटी, बद्धकोष्ठता, अपचन, खूप उष्णता अशा सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आपट्याच्या पानांची मदत होत असते
या पानांचे सेवन करुन तुम्ही अनेक समस्यापासून सुटका मिळवू शकता. यासाठी तुम्ही आपट्याच्या पानांच्या रसाचे सेवन करु शकता
नवरात्रीत अनेकजण 9 दिवस उपवास करत असतात. ज्यामुळे नंतर त्यांना अपचनाचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो. अशात सकाळचे जेवण झाल्यानंतर तुम्ही आपट्याच्या 2 पानांचे सेवन केले तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही
हा रस तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपट्याची पाने 2 ते 3 तास पाण्यात भिजवा आणि मग मिक्सरमध्ये ही पान आणि थंडगार पाणी टाकून याचा रस तयार करा