श्रावण महिन्यात असंख्य सण असतात. सणांच्या दिवसांमध्ये सर्वच महिला साडी नेसून सुंदर तयार होतात. साडी नेसल्यानंतर काहींना अतिशय पारंपरिक लुक करायला आवडतो तर काहींना थोडा स्टायलिश लुक करायला खूप जास्त आवडते. साडी नेसल्यानंतर महिलांच्या सौंदर्यात भर पडते. भारतीय परंपरेनुसार सणावाराच्या दिवसांमध्ये मराठमोळा लुक करतात. पण बऱ्याचदा साडी नेसल्यानंतर महिला काम करण्यास जमत नाही. साडी सांभाळताना महिलांची तारांबळ उडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पहिल्यांदा साडी नेसताना कशा प्रकारे साडी नेसावी, याबद्दल काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून साडी नेसल्यास घरातील कामांमध्ये अडथळा येणार नाही. (फोटो सौजन्य –pinterest)
सणावाराच्या दिवसांमध्ये साडी नेसताना फॉलो करा सोप्या टिप्स
सणावाराच्या दिवसांमध्ये घाईगडबडीच्या वेळी कॉटन, सॉफ्ट सिल्क, शिफॉन, कॉटन सिल्क इत्यादी साड्यांची निवड करावी. या साड्यांमध्ये जास्त गरम होत नाही. तसेच त्वचेला कोणते इन्फेक्शन होत नाही.
घरातील काम करताना साडीचा पदर कायमच लहान असावा. यामुळे पदर कंबरेला खोचल्यानंतर कोणतेही अडथळे येणार नाहीत. वाकल्यावर किंवा चालताना पदर पायात अडकणार नाही.
साडीच्या निऱ्या काढताना टोकाला पिन लावावी. यामुळे निऱ्या कितीही काम केले तरी खाली सुटत नाहीत. साडीच्या निऱ्याना कायमच बाहेरील बाजूने पिन लावावा.
बऱ्याचदा कॉटनची साडी नेसताना साडीच्या निऱ्या जास्त फुलेल्या दिसू लागतात. अशावेळी कॉटन साडी नेसण्याआधी साडीला कडक इस्त्री करून घ्यावी. यामुळे साडी अंगावर अतिशय चापून चोपून बसते.
साडीचा पदर काढताना ब्लाऊज आणि पदराचे टोक जास्त ताणून घेऊ नये. यामुळे साडी फाटण्याची जास्त शक्यता असते. साडी फटू नये म्हणून साडीला साधे पिन लावावे.