पाणी हा आपल्या रोजच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे . आपण घराबाहेर पडलो ही बहुतेकदा पाण्याची बाटली सोबत ठेवतो, जेणेकरून आपल्याला तहान लागली तर आपल्याला पाणी पिता येईल. तसेच कधी कधी आपण घाईगडबडीत ही पाण्याची बाटली घ्यायला विसरतो. अशा वेळेस बहुतेक जण बाहेरून पाण्याची बाटली विकत घेतात. आता तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे की, विकत मिळणाऱ्या पाण्याच्या बाटलीचा रंग हा विशिष्ट कारणासाठी तसा ठेवलेला असतो. आज आपण पाण्याच्या बाटलीच्या रंगामागील अर्थ जाणून घेणार आहोत.
पाण्याच्या बाटलीचं झाकण निळ्या रंगाचं का असतं? वेगवेगळ्या रंगामध्ये दडलाय अनोखा अर्थ
विकत मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या विविध पद्धतींनी भरल्या जातात. त्यामुळेच बाटल्यांच्या झाकणावर तशाच पद्धतीही झाकणेही लावली जातात
विकत मिळणाऱ्या पाण्याच्या बाटलीच्या झाकणाचा रंग हा विशेषतः निळ्या रंगाचा असतो. पाण्याच्या बाटलीवर निळ्या रंगाचं झाकण असणं म्हणजे, बाटलीत क्षारयुक्त किंवा झऱ्याचं पाणी आहे
तसेच जर पाण्याच्या बाटलीवर पांढऱ्या रंगाचं झाकण असेल तर त्याचा अर्थ यात पाणी सामान आहे असा होतो. तसेच पाण्याच्या बाटलीचे झाकण हिरव्या रंगाचे असल्यास यात फ्लेव्हरयुक्त पाणी असते.
पाण्याच्या बाटलीवर लाल रंगाचे झाकण असल्यास ते स्पार्कलिंग वाॅटर असत. याचप्रमाणे बाटलीवर पिवळ्या रंगाचे झाकण असल्यास त्यात व्हिटॅमिन आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात.
याचबरोबर बाटलीचे झाकण काळे असल्यास त्यात अल्कलाइन वाॅटर असते. हा रंग सहसा प्रीमियम प्रोडक्टससाठी वापरला जातो
काही बाटल्यांवर गुलाबी झाकण असल्यास हा रंग ब्रेस्ट कॅन्सर आणि काही धर्मदाय उपक्रमांसाठी असतो