चुकीचा आहार, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, दारूचे सेवन इत्यादी हानिकारक पदार्थांचे सेवन केल्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागते. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर योग्य वेळी उपचार करणे आवश्यक आहे. लिव्हर शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. मात्र फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर विषारी घटक लिव्हरमध्ये तसेच साचून राहतात. म्हणूनच आज आम्ही फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
Fatty Liver च्या समस्यांपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ
अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने होते. कॉफीचे सेवन करणे आरोग्यासाठी जितके चांगले आहे तितकेच वाईट सुद्धा आहे. कॉफीचे सेवन केल्यामुळे यकृतातील एंजाइमची पातळी सुधारते.
रोजच्या आहारात नेहमीच हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, मोहरीची साल, चवळी इत्यादी भाज्यांचे सेवन करावे. या भाज्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे लिव्हरमधील घाण बाहेर काढून टाकतात.
सकाळच्या नाश्त्यात इतर कोणत्याही तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी ओट्स खावेत. ओट्समध्ये असलेले फायबर शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात.
लिव्हरच्या आरोग्यासाठी अक्रोड खाणे अतिशय प्रभावी आहे. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि ग्लूटाथिओन आढळून येते. ज्यामुळे लिव्हरमध्ये वाढलेली जळजळ कमी होते.
जेवणातील पदार्थ बनवताना लसूणचा वापर करावा. लसूणमध्ये असलेले अॅलिसिन आणि सेलेनियम लिव्हरमध्ये वाढलेली जळजळ कमी करतात आणि लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात.