निरोगी आरोग्य जगण्यासाठी शरीरात झिंक असणे आवश्यक आहे. शरीरामध्ये झिंकची योग्य पातळी असल्यास आरोग्याला हानी पोहचत नाही. मात्र शरीरामध्ये झिंकची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्य बिघडू लागते. याशिवाय शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. जखम लवकर बरी न होणे, चव वास कमी होणे, मानसिक आरोग्यावर परिणाम होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी 'हे' पदार्थ खावेत
रोजच्या आहारात गहू, बाजरी, ज्वारी इत्यादी धान्यांचे सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. धान्यांमध्ये फायटेट्स घटक आढळून येतो,. ज्यामुळे झिंकची कमतरता भरून निघते.
सुकामेवा खाणे अनेकांना आवडते. शरीरात निर्माण झालेली झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय आहारात तुम्ही भिजवलेले मनुके सुद्धा खाऊ शकता.
झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे. त्यामध्ये तुम्ही दूध, दही, चीज, मिल्कशेक इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. या पदार्थांमध्ये झिंक सोबतच कॅल्शियम सुद्धा आढळून येते.
आहारामध्ये भोपळ्याच्या बिया, चिया सीड्स, अळशीच्या बिया इत्यादी बियांचे सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली झिंकची कमतरता भरून निघेल. याशिवाय तुम्ही आहारात हरभरा, मसूर आणि राजमा इत्यादी डाळींचे सेवन करू शकता.
शरीरात निर्माण झालेली झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात सीफूडचे सेवन करावे.याशिवाय मासे, चिकन, मटण इत्यादी पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक आढळून येते. दैनंदिन आहारात तुम्ही खेकडे, कोळंबी इत्यादी माशांचे सेवन करू शकता.