दरवर्षी जगभरात अनेक चित्रपट रिलीज होतात, यातील काही चित्रपट हिट ठरतात तर काही फ्लॉप. सध्या बिग बजेट मुव्हीझ फार चर्चेत आहेत. अशातच आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाविषयी माहिती सांगत आहोत जो इतिहासातील सर्वात महागड्या चित्रपटांमध्ये गणला जातो. याची विशेष बाब म्हणजे, हा चित्रपट 15 वर्षांपूर्वी तयार केला तरीही याला आजवर रिलीज करता आले नाही. याला बवण्यासाठी बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, मात्र अपूर्ण शूटिंग आणि वाढता खर्च यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट कधीच मोठ्या पडद्यावर पाहता आला नाही.
15 वर्षे जुना जगातील सर्वात महागडा चित्रपट, 10 अब्जाहून अधिकचा आला खर्च पण आजवर झाला नाही रिलीज
'अवतार' आणि 'ॲव्हेंजर्स' सारख्या मोठ्या हॉलिवूड चित्रपटांना टक्कर देऊ शकेल असा चित्रपट बनवण्याची योजना चिनी रिअल इस्टेट व्यावसायिक जॉन जियांग यांनी आखली. त्याला एक मोठा ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपट बनवायचा होता, ज्याचे नाव होते 'एम्पायर्स ऑफ द डीप'
त्याच्याकडे पैशांची कमतरता नव्हती, म्हणून त्याने हॉलिवूडचे बडे स्टार्स आणि दिग्दर्शकांशी संपर्क साधला. हा चित्रपट वर्षानुवर्षे लोकांच्या स्मरणात रहावा असा त्यांचा विचार होता मात्र तो कधीही रिलीज होऊ शकला नाही
या चित्रपटाला आता 15 वर्षे उलटून गेली आहेत. या चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी 4 वर्षे लागली आणि दहाहून अधिक लेखकांनी 40 हून अधिक मसुदे तयार केले. चित्रपटाची कथा पाण्याखालील जगावर आधारित होती. त्यामुळे त्याचे बहुतांश चित्रीकरण पाण्याखाली करावे लागले. ते उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सने परिपूर्ण करण्यासाठी 130 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 10.96 अब्ज रुपये) चे बजेट निश्चित करण्यात आले होते
चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी तीन दिग्दर्शक आणले मात्र कुणीही फार काळ टिकू शकलं नाही. अखेरीस, 2010 मध्ये चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, परंतु तो अपूर्ण वाटला. 3 वर्षे झाली तरी चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर प्रसिद्ध हॉलिवूड संपादक मायकल कहान यांना ते पूर्ण करण्यासाठी बोलावण्यात आले
त्याच वेळी या चित्रपटाच्या काही भागांचे पुन्हा शूटिंग आवश्यक होते, त्यामुळे बजेट आणखी वाढण्याची शक्यता होती. इतके बदल करूनही चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही आणि अपूर्णच राहिला. बरेच दिवस हा चित्रपट पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू होते, पण वारंवार येणाऱ्या अडचणी आणि वाढता खर्च यामुळे अखेर हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेण्यात आला