लग्नातील नऊवारी साडीवर सुंदर सुंदर मोत्याचे आणि सोन्याचे दागिने परिधान केले जाते. यामुळे गळा अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतो. गळ्यात घातलेले ठसठशीत दागिने संपूर्ण लुकची शोभा वाढवतात. लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच साड्या आणि दागिन्यांची खरेदी केली जाते. त्यातील सगळ्यांचं आवडणारा मराठमोळा दागिना म्हणजे चिंचपेटी. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिला सहावारी आणि नऊवारी साडीवर चिंचपेटी दागिना परिधान करतात. हा दागिना सर्वच साड्यांवर अतिशय खुलून दिसतो. (फोटो सौजन्य – pinterest)
गळ्यात परिधान करा 'या' डिझाईनची मोती चिंचपेटी

मोत्याची वेल असलेल्या चिंचपेटीला बाजारात सध्या खूप जास्त मागणी आहे. कारण वेल असलेली चिंचपेटी गळ्यात घातल्यानंतर गळ्याचे सौंदर्य अतिशय खुलून दिसते.

चिंचपेटी केवळ मोत्यामध्ये नाहीतर ऑक्सिडाइज दागिन्यांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. कॉटन साडी किंवा मल कॉटन फॅब्रिकची साडी परिधान केल्यानंतर ऑक्सिडाइज चिंचपेटी तुम्ही घालू शकता.

मोत्यांऐवजी तुम्ही गोल्डन रंगाची चिंचपेटी सुद्धा साडीवर घालू शकता. यामुळे गळा भरगच्च दिसतो आणि इतर कोणताही दागिना परिधान करण्याची आवश्यकता भासत नाही.

फॅशनच्या युगात पारंपरिक दागिने पुन्हा नव्याने ट्रेंडमध्ये आले आहेत. बाजारात फुलांच्या आणि वेगवेगळ्या आकर्षक डिझाईनच्या चिंचपेटी उपलब्ध आहेत.

काहींना अतिशय नाजूक साजूक दागिने परिधान करायला खूप जास्त आवडतात. अशावेळी तुम्ही या डिझाईनची चिंचपेटी घालू शकता. यामुळे गळा अतिशय सुंदर दिसेल.






