सर्वच महिलांना सुंदर सुंदर दागिने परिधान करायला खूप आवडता. दागिने घातल्यानंतर महिलांच्या लुकमध्ये अनेक बदल दिसून येतात. मंगळसूत्र, कानातले, बांगड्या, नेकलेस इत्यादी अनेक दागिने महिला साडी नेसल्यानंतर किंवा मराठमोळा लुक केल्यानंतर दागिने घातले जातात. मात्र हल्ली बाजारात किंवा अनेक ठिकाणी तुम्ही एअर कफ पहिले असतील. कानाच्या मागे परिधान केले जाणारे कानातले अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला साडीवर किंवा इतर वेस्टन ड्रेसवर घालवण्यासाठी काही सुंदर एअर कफ डिझाईन आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या डिझाईन्स नक्की ट्राय करून पहा. (फोटो सौजन्य – pinterest)
कानाची शोभा वाढवण्यासाठी परिधान करा 'या' डिझाईन्सची सुंदर कर्णफुल
नऊवारी किंवा पैठणी साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही स्टोन वर्क केलेले एअर कफ घालू शकता. स्टोनचे एअर कफ परिधान केल्यानंतर तुमचा लुक उठावदार दिसेल.
मोराचे नक्षीकाम असलेले सुंदर एअर कफ तुम्ही साडीवर घालू शकता. सोन्याचे एअर कफ आकाराने मोठे असले तरीसुद्धा साडी परिधान केल्यानंतर त्यावर घातल्यास अतिशय सुंदर दिसतील. सोन्याच्या एअर कफ मध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करून घेऊ शकता.
मोती आणि खड्यांचा वापर करून बनवलेले एअर कफ नऊवारी साडीवर अतिशय सुंदर दिसतात. या पद्धतीचे एअर कफ घातल्यास कान अतिशय सुंदर दिसतील.
कानांच्या मागे घेतलेल्या सुंदरी वेली कोणत्याही ड्रेसवर परिधान केल्यास तुमचा लुक उठावदार दिसेल. यामुळे तुमच्या कानांना कोणतीही इजा होणार नाही.
आपल्यातील अनेकांना आकाराने जास्त लहान आणि कमी वर्क असलेले दागिने परिधान करायला खूप आवडतात. अशावेळी तुम्ही या डिझाईन्सचे एअर कफ घालू शकता.