सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा लग्नसराईत सर्वच महिला साडी नेसून तयार होतात. साडी नेसल्यानंतर त्यावर सोनं आणि मोत्याचे आकर्षक दागिने परिधान केले जातात. दागिने घातल्यानंतर महिला अतिशय आकर्षित दिसतात. तसेच हल्ली बाजारात अनेक नवनव्या डिझाईन्सचे दागिने उपलब्ध झाले आहेत. त्यात मोत्याचे दागिने, चंद्रकोर दागिने मोठ्या प्रमाणावर परिधान केले जात आहेत.चंद्रकोर डिझाईन केवळ साड्यांमध्येच नाहीतर दागिन्यांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मराठमोळ्या चंद्रकोर दागिन्यांच्या काही सुंदर डिझाईन्स तुम्हाला सांगणार आहोत. या डिझाईन्स लग्न किंवा सणावारांच्या दिवसांमध्ये नक्की परिधान करून पहा.(फोटो सौजन्य – सोशल मिडिया)
चंद्रोकर पॅटर्नची साडीचं नाहीतर दागिने सुद्धा दिसतील सुंदर!
केसांमध्ये खोपा घातल्यानंतर या पद्धतीची चंद्रकोर लावल्यास केस अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतील.याशिवाय तुम्ही वेणी किंवा अंबोडा घातल्यानंतर या डिझानची चंद्रकोर लावल्यास केसांची शोभा आणखीन वाढेल.
साडी किंवा ड्रेस घातल्यानंतर चंद्रकोर नेकलेस घातल्यास तुमचा लुक अतिशय सुंदर दिसेल. चंद्रकोर नेकलेसमध्ये अनेक वेगवेगळे नेकलेस बाजारात उपलब्ध झाले आहेत.
अनेक महिलांना जास्त हेवी आणि वर्क केलेले दागिने परिधान करायला आवडत नाहीत. अशावेळी तुम्ही चंद्रोकर कानातले परिधान करू शकता. चंद्रकोर कानातले तुमच्या लुकची शोभा वाढवतील.
पैठणी किंवा सिल्क साडी नेसल्यानंतर सगळ्यांचं मोत्याचे दागिने घालायला खूप आवडतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा साडी नेसल्यानंतर या पॅटर्नचे चंद्रकोर चोकर परिधान करू शकता.
पूर्वीच्या काळापासून ते आतापर्यंत सर्वच घरांमधील महिला ठुशी हा पारंपारिक दागिना परिधान करतात. त्यामुळे तुम्ही ठुशीमध्ये चंद्रकोर पेंडण्ट बनवून घेऊ शकता.