मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- सोशल मीडिया)
छगन भुजबळ यांनी केले देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक
नायगावचे नामकरण करण्याची मागणी
सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन
नायगाव: सातारा जिल्ह्यात नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सरकारमधील मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. आजारी असून देखील मंत्री छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित नायगाव येथील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे. 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात सध्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी महायुती एकत्रित तर अनेक ठिकाणी वेगवगळे लढणार आहेत. त्याच दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले, ‘माझे ऑपरेशन नुकतेच झाले आहे. डॉक्टरांच्या परवानगीने मी कार्यक्रमाला आलो आहे. सावित्रीबाई फुले यांना मी वंदन करतो. या ठिकाणी सुशीलकुमार यांच्या काळामध्ये नायगावचा विकास करण्यात आला. दरम्यान आताच्या सरकारने 150 कोटींचा निधी दिला आहे. ‘देवा भाऊ देता है तो छप्पर फाड के देता है’, असे कौतुक छगन भुजबळ यांनी केले.
सांगलीतून भाजपचा प्रचाराचा नारळ फुटला
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाला, भाजपचा राज्यातील प्रचाराची सुरुवात शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली, यावेळी त्यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा निधीची कमतरता पडू देणार नाही, असे अश्वसन दिले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार अतुल भोसले, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज देशमुख, नितीन शिंदे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, मकरंद देशपांडे, समित कदम, शेखर इनामदार, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले होते, सांगली सर्वात चांगली, म्हणून आम्ही भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीतून करत आहोत. सांगलीत आजपर्यंत अनेक कामांना निधी दिला, १०५ कोटी पाणीपुरवठा योजनेसाठी, ७९ कोटी घनकचरा व्यवस्थापनासाठी, १५ कोटी रुपये शाहू महाराज मार्गासाठी, ३ कोटी काळीखन सुशोभीकरण करण्यासाठी, २५३ कोटी मलनिस्सारण प्रकल्पासाठी, ६० कोटी एलईडी पथदिवे लावण्यासाठी असे कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे, भाजपचा झेंडा फडकवा आम्ही निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.






