आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे. संपूर्ण जगभरात या स्वर्ण उत्सवाला मोठ्या अभिमानाला साजरा केला जातो. हा सोनेरी दिवस अवघ्या मराठी जणांसाठी फार महत्वाचा आहे. इतिहासाच्या पानावर मराठ्यांचा इतिहास आणि हिंदवी स्वराज्याची कल्पना मराठी मनाच्या अग्रस्थानी ठेवणारे आपले राजे शिवछत्रपती यांचा गौरव संपूर्ण जगभरात केला जात आहे.
माझ्या राज्यांची कीर्ती इतकी महान की विदेशाची मातीही नतमस्तक झाल्याशिवाय राहात नाही! (फोटो सौजन्य - Social Media)
इंडोनेशियाचे प्रसिद्ध शहर बाली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. हे स्मारक इंडोनेशिया आणि भारताच्या दरम्यान असलेल्या सांस्कृतिक एकरूपतेची जाणीव करून देते.
युनाइटेड किंग्डममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक स्मारके आहेत. तेथे अनेक भारतीय समाज केंद्र आहेत, त्या ठिकाणी महाराजांचे स्मारक दिसून येतात.
मॉरिशस म्हणजे दुसरा भारताचं! येथे भारतीयांची संख्या अफाट आहे. काही भारतीय तर तेथील कायमचे स्थायिक झाले आहेत. आपले मूळ भारताशी जोडून ठेवण्यासाठी त्यांनी छत्रपतींचे अनेक स्मारके उभारली आहेत.
सुरिनेम या देशामध्ये अनेक भारतीय वास्त्यव्यास आहेत. येथे ही छत्रपतींचे अनेक स्मारके पाहायला मिळतात. तसेच अनेक भारतीय महापुरुषांचे स्मारके उभारली गेली आहेत.
कॅनडा आणि अमेरिका येथे तर विचारांच्या पलीकडे भारतीय राहतात. येथील भारतीयांनी टोरांटो, न्यू जर्सी तसेच कॅलिफोर्निआसारख्या शहरांमध्ये छत्रपतींचे स्मारके उभारली आहेत.