सर्वच महिलांना दागिने घालायला खूप आवडतात. पायांमध्ये चांदीच्या किंवा सोन्याच्या पैंजण परिधान केल्या जातात. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा लग्नसराईत महिला पायांची शोभा वाढवण्यासाठी वेगवगेळ्या डिझाईन्सच्या नाजूक साजूक पैंजण घातल्या जातात. मात्र हल्ली बाजारात अनेक नवनवीन डिझाईन्सच्या पैंजण उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पायांमध्ये घालण्यासाठी काही सुंदर आणि नाजूक डिझाईन्सच्या पैंजण दाखवणार आहोत. या डिझाईन्सच्या पैंजण लग्नसराईत किंवा रोजच्या वापरात तुम्ही घालू शकता.(फोटो सौजन्य – pinterest)
पायांमध्ये परिधान करा 'या' नाजूक साजूक डिझाइन्सचे सुंदर पैंजण
लग्नात लेहेंगा किंवा हेवी वर्क केलेली साडी घातल्यानंतर त्यावर तुम्ही या डिझाइन्सचे घुंगरू असलेले पैंजण परिधान करू शकता.
काहींना रोजच्या वापरात नेहमी पैंजण घालायला खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही या नाजूक डिझाईन्सच्या पैंजण नेहमी घालू शकता. यामुळे तुमच्या पायांची शोभा वाढेल.
लग्नातील हळदी समारंभात तुम्ही कुंदन वर्क केलेली सुंदर पैंजण परिधान करू शकता. हळदीच्या कपड्यांवर कुंदन वर्क केलेली पैंजण उठावदार दिसेल.
चांदीप्रमाणे बाजारात सोन्याचे देखील पैंजण बनवून मिळतात. सिंगल पटी असलेली पैंजण पायात अतिशय सुंदर आणि उठावदार दिसेल.
लग्नात पायांची शोभा वाढवण्यासाठी चांदीचे मोठे पैंजण परिधान केले जातात. यामुळे तुमचे पाय अधिक सुंदर आणि उठावदार दिसतात.