ओव्हरलोड कोळसा वाहतूक ठरतेय जीवघेणी! अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिकांच्या सुरक्षिततेस धोका
यवतमाळ: वेकोलि परिसरातून मोठ्या प्रमाणात कोळशाची ओव्हरलोड वाहतूक सुरू असून, मुख्य मार्गावरून कोळसा भरलेल्या ट्रकवर ताडपत्री न टाकता वाहतूक केली जात आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. यवतमाळमधील वणी तालुक्यात दगडी कोळशाचे मुबलक साठे असून, मुंगोली, कोलगाव, पैनगंगा व निर्गुडाडीप या ठिकाणी खुल्या कोळसा खाणींचे जाळे तयार झाले आहे. या खाणीतून सिमेंट कंपन्या आणि इतर ठिकाणी कोळसा वाहतूक केला जातो. वेकोलि परिसरातून साखरा-शिंदोला-आबाई फाटा-शिरपूर-चारगाव चौकी मार्गाचे मागील वर्षी बांधकाम झाले, तरीही दिवस-रात्र कोळशाची वाहतूक सुरू असल्याने रस्ता दुरुस्तीत अपुरेपणा जाणवतो.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
भाजपाच्या विचारात स्त्री-पुरुष समानता नाही, महिलांना दुय्यम स्थान; हर्षवर्धन सपकाळांची टीका
मार्गावर अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्यामुळे कोळशाच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर कोळशाचे ढेले पडतात, बारीक कोळसा प्रदूषणाचे कारण बनतो व अपघातांची शक्यता निर्माण होते. साखरा, कोलगाव, आबाई फाटा, शिरपूर, चारगाव चौकी या मार्गावरून ट्रकची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे, ज्यामुळे अपघातांची वाढ होत आहे.
रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहेत. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्याची कोळशाच्या वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहेत. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहनांची वर्दळ असल्यामुळे अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तरीही ओव्हरलोड कोळसा वाहतुकीवर नियंत्रण कोण ठेवणार, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.
Pune Weather : पुणे शहरातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती; पुढील तीन दिवस हवामान…
झरी तालुक्यातील झरी ते दाभाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर जागोजागी खड्ढे तयार झाले असून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हा रस्ता मांगुर्ला (बु.), मांगुर्ला (खु.), दाभाडी, लहान दाभाडी, वाल्हासा, वरपोड, शिवपोड, बोरीपोडी, निमणी, वाढोणा, सुसरी, पेंढारी, बोरगाव तसेच लहान-मोठ्या कोलाम पोड वस्त्या जोडतो. या भागातील नागरिकांना तहसील, पंचायत समिती, पोलिस ठाणे, आरोग्य केंद्र आणि कृषी विभागासारख्या कार्यालयीन कामांसाठी ये-जा करावी लागते. नागरिकांना मोटारसायकलने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.






