लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. लग्नसराईच्या दिवसांमध्ये सगळ्यात आधी डोळ्यासमोर सगळ्यात पहिली आठवण होणारा विषय म्हणजे लग्नाची शॉपिंग. लग्न म्हंटल की नवीन साड्या, नवीन कपडे. अनेकदा मुलींना लग्नासाठी साड्या विकत घेतल्यानंतर कोणत्या पॅटर्न्सचा ब्लाऊज शिवावा, असा प्रश्न पडतो. हल्ली हेवी वर्क केलेले ब्लाउज मोठ्या प्रमाणावर लग्नसराईमध्ये परिधान केले जात आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हेवी ब्लाऊजचे काही सुंदर पॅटर्न्स सांगणार आहोत. या पद्धतीने ब्लाऊज नक्की शिवून पहा. (फोटो सौजन्य-pinterest)
लेटेस्ट ब्लाऊज पॅटर्न्स
मुलींना मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालायला खूप आवडतात. अशावेळी तुम्ही या डिझाईनचे सुंदर ब्लाउज शिजवून घेऊ शकता. तुमचा लुक खूप सुंदर आणि उठावदार दिसेल.
लग्नामध्ये घालण्याच्या ब्लाऊजवर तुम्ही डोली पॅच लावू शकता. हा पॅच खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो.
मोती आणि खड्यांचा वापर करून बनवलेले ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात. काठपदराच्या किंवा पैठणी साडीवर तुम्ही या पद्धतीचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
लग्नामध्ये सर्वच मुली नऊवारी किंवा सहावारी साडी नेसताना. त्यामुळे तुम्ही या साड्यांवर या पद्धतीचे ब्लाऊज शिवून आणि वर्क करून घेऊ शकता. तसेच ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला लटकन लावून नवरा नवरीच्या नावाचे पहिले लेटर लावू शकता.
हल्ली मुलींना लग्नात साडीपेक्षा ब्लाऊज सुंदर आणि आकर्षक हवा असतो. अशावेळी तुम्ही या डिझाईनचे खड्यांचे वर्क केलेले ब्लाऊज शिवू शकता.