महिला सौंदर्यात भर पाडण्यासाठी नेहमीच काहींना काही दागिने हातामध्ये किंवा गळ्यात घालत असतात. सोन्याचे दागिने घातल्यामुळे लुक खूप सुंदर आणि उठावदार दिसतो. अनेक महिलांना नेहमीच हातामध्ये सोन्याच्या बांगड्या घालण्याची सवय असते. सोन्याचे बांगड्या हातामध्ये घातल्यानंतर हात खूप सुंदर दिसतात. मात्र बऱ्याचदा हातामधील सोनं काळ पडून जात. हातामधील बांगड्या काळ्या झाल्यानंतर त्यांची शोभा कमी होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काळ्या झालेल्या सोन्याच्या बांगड्या पुन्हा उजळ्वण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)
काळपट झालेल्या सोन्याच्या बांगड्या उजळ्वण्यासाठी सोप्या टिप्स
सोन्याच्या बांगड्या उजळ्वण्यासाठी तुम्ही घरगुती पदार्थांचा वापर करू शकता. यामुळे बांगड्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. बांगड्या आहेत तशाच व्यवस्थित राहतील.
मोठ्या वाटीमध्ये अर्धा कप पाणी घेऊन त्यात व्हिनेगर टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर पाण्यात सोन्याच्या बांगड्या काहीवेळ भिजत ठेवा. त्यानंतर टूथ ब्रशच्या मदतीने बांगड्या व्यवस्थित घासून घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा बांगड्या पाण्याने स्वच्छ करा.
वाटीमध्ये अर्धा चमचा व्हिनेगर टाकून त्यात बेकिंग सोडा टाकून मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेली पेस्ट बांगड्यांवर लावून तशीच ठेवा आणि ब्रशच्या साहाय्याने बांगड्या व्यवस्थित घासून घ्या.
ब्रशवर टूथपेस्ट घालून बांगड्या घासल्यास सोन्याच्या बांगड्या नव्या सारख्या सुंदर आणि चमकदार दिसू लागतील. ब्रशने बांगड्या घासल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात अमोनियाचे २ थेंब टाकून बांगड्या पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर बांगड्या ब्रशचे स्वच्छ घासून घ्या. यामुळे तुमच्या बांगड्या नव्या सारख्या सुंदर दिसतील.