लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. लग्न ठरल्यानंतर दोन ते तीन महिने आधीपासूनच लग्नाची तयारी केली जाते. विधी सोहळ्यासाठी मुली पारंपरिक पद्धतीमध्ये नऊवारी साडी आणि त्यावर सुंदर सुंदर पारंपरिक दागिने घालतात. कानात झुमके, एअर कफ किंवा कानांच्या वेली लावल्या जातात. यासोबतच सर्वच्या महिलांच्या आवडीचा दागिना म्हणजे बुगडी. नऊवारी साडीवरील पारंपरिक आणि हटके लुक बुगडी घातल्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मराठमोळ्या बुगडी दागिन्यांच्या काही सुंदर डिझाईन्स बदल सांगणार आहोत. या डिझाईन नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्न सोहळ्यात करा मराठमोळा साज! नऊवारी साडीवर घाला ठसठशीत बुगडी

अनेकांना सोन्याच्या बुगड्या घालायला खूप जास्त आवडतात. या बुगड्या कानात घातल्यानंतर कान अतिशय भरगच्च दिसतात. पूर्वीच्या काळी सर्वच महिला कानात सोन्याच्या बुगड्या घालत असे.

मराठमोळ्या लुकला मॉर्डन टच देण्यासाठी स्टोनवर्क केलेली बुगडी घालू शकता. स्टोन वर्क केलेली बुगडी कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर अतिशय सुंदर दिसते.

नऊवारी साडीवर मोत्याच्या बुगड्या अतिशय सुंदर दिसतात. या डिझाईनच्या मोती बुगड्या कानांची शोभा वाढवतात.

बाजारात सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे चांदीचे आणि ऑक्सिडाइज दागिने सुद्धा उपलब्ध आहेत. चांदीच्या बुगड्या पाहतच क्षणी लक्षज वेधून घेतात.

काहींना अतिशय कमी दागिने घालायला खूप जास्त आवडतात. अशांनी मोठ्या आकाराची सुंदर आणि नक्षीदार बुगडी घातल्यास चारचौघांमध्ये लुक सुंदर दिसेल.






