कोणताही जीव किंवा माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो एक विशिष्ट लिंग घेऊन जन्माला येतो. कोणीही जन्माला आला की त्याच लिंग समजतं. आजकाल वैद्यकीय शास्त्रक्रियेतून आपले लिंग बदलता येते मात्र आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका जीवाविषयी माहिती सांगत आहोत जो जन्मानंतर नैसर्गिकरित्या आपलं लिंग बदलतो. हा जीव म्हणजे पाण्यात राहणार मासा आहे. चला याचे नाव जाणून घेऊया.
जगातील एकमेव असा जीव जो जन्माला येताना असतो नर पण शेवटी बनतो मादा
बारामुंडी मासा हा जन्मतः नर असतो, पण तीन ते चार वर्षांनी तो मादीमध्ये रूपांतरित होतो. हा मासा समुद्रात जन्मतो, पण गोड पाण्यात राहायला पसंत करतो. याला ‘एशियन सी बास’ असंही म्हणतात. पांढऱ्या-चंदेरी रंगाचा हा मासा लिंग बदलण्याच्या नैसर्गिक क्षमतेसाठी ओळखला जातो
बारामुंडी मास्यासारखे शेकडो प्राणी स्वतःहून लिंग बदलू शकतात. यासाठी कोणतीही शस्त्रक्रिया, औषधं किंवा उपकरणं लागत नाहीत. न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांनी ५०० हून अधिक अशा प्रजाती शोधून काढल्या आहेत. यामध्ये मासे, काही सरपटणारे प्राणी आणि समुद्री जीवांचा समावेश आहे
या प्रजातींची खासियत म्हणजे त्या मादी म्हणून जन्म घेतात, पण परिस्थिती बदलताच नर बनतात. उदाहरणार्थ, जेव्हा त्यांच्या गटातील नर मरतो, तेव्हा सर्वात मोठी मादी त्याची जागा घेते. त्यांचा रंग, वागणूक आणि शारीरिक रचना देखील त्यानुसार बदलते. ही प्रक्रिया पूर्णतः जैविक असते
शास्त्रज्ञांनी सांगितले की लिंगबदल ही अनुवांशिक प्रक्रिया असते. त्यांच्या संशोधनात असे जनुकही आढळले जे लिंग बदलताना सक्रिय होतात. या प्रक्रियेमुळेच प्राणी परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलू शकतात. हे संशोधन 'साइन्स ॲव्हान्सेस' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे
लिंगबदल हे या प्राण्यांचं जीवन टिकवण्यासाठीचं नैसर्गिक शहाणपण आहे. नर प्राणी नसल्यानं मादी प्रजाती नरामध्ये रूपांतरित होतात आणि प्रजनन सुरू ठेवतात. यामुळे त्यांच्या प्रजातीचा अस्तित्व टिकून राहतो. ही प्रक्रिया निसर्गातील संतुलन राखण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते