दैनंदिन आहारात सतत मसालेदार आणि तिखट, तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल साचून राहते. शरीरात साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करतात. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. नसांमध्ये साचून राहिलेला पिवळा चिकट थर रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करतो, ज्यामुळे रक्तभिसरण व्यवस्थित होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नसांमध्ये साचून राहिलेले घाण स्वच्छ करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे नसांमधील कचरा स्वच्छ होईल. (फोटो सौजन्य – istock)
रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली घाण कायमची स्वच्छ करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
नसांमध्ये साचून राहिलेला पिवळ्या रंगाचा चिकट थर रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतो. ज्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, मज्जातंतू रोग होण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी घरगुती उपाय करून आराम मिळवावा.
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पालकच्या रसाचे सेवन करावे. पालक खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.
तुम्हाला जर भाज्यांचा रस पिण्यास आवडत नसेल तर तुम्ही सुपारीची पाने, मुळ्याच्या भाजीची पाने, कोथिंबीरीचे पाने, पालक भाजीची पाने, कोशिंबिरीची पाने आणि कढीपत्त्याची पाने सॅलडमध्ये मिक्स करून खाऊ शकता. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल.
सकाळी उठल्यानंतर नियमित हिरव्या रसाचे सेवन करावे. हिरवा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करेल.
सकाळच्या वेळी उपाशी पोटी तुम्ही हिरवी पाने चावून खाऊ शकता. ही पाने चावून खाल्ल्यास पचनाच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळेल. त्यामुळे तुम्ही कडुलिंब किंवा कढीपत्त्याची पाने चावून खाऊ शकता.