हल्ली प्रत्येक मुलीच्या कपाटात एकतरी चिकनकारी पार्टनमधील ड्रेस किंवा साडी असते. चिकनकरी ड्रेसमध्ये अनेक वेगवेगळे पार्टन बाजारात उपलब्ध आहेत. कॉटन फॅब्रिकमधील चिकनकारी ड्रेसवर हाताने वर्क केले असते.हा ड्रेस तयार करण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. मात्र बऱ्याचदा चिकनकारी ड्रेसची योग्य काळजी न घेतल्यामुळे ड्रेसवरील वर्क लगेच खराब होऊन जाते. ड्रेसवर करण्यात आलेले बारीक आरशांचे वर्क किंवा पांढऱ्या घाग्याचा वापर करून करण्यात आलेले वर्क लगेच खराब होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चिकनकारी ड्रेस लगेच खराब होऊ नये म्हणून कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास तुमचा चिकनकारी ड्रेस वर्षानुवर्षे चांगला टिकून राहील. (फोटो सौजन्य – pinterest)
चिकनकारी ड्रेसवरील एम्ब्रॉयडरी खराब होऊ नये म्हणून फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
चिकनकारी कपडे स्वच्छ केल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून कपाटात ठेवू नये. यामुळे कपड्यांची गुणवत्ता खराब होते आणि ड्रेसचा रंग बदलतो.
चिकनकारी ड्रेस धुवताना ५ ते १० मिनिटं साबणाच्या पाण्यात घालून ठेवावा. त्यानंतर हलक्या हाताने कपडे स्वच्छ करावे. कधीही चिकनकारी ड्रेस मशीनमध्ये धुवू नये.
चिकनकारी ड्रेस, साडी किंवा इतर कपडे धुवताना ते हाताने धुवावे. या कपड्यांवर कधीही ब्रशचा वापर करू नये. यामुळे ड्रेसवर करण्यात आलेले वर्क लगेच खराब होऊन जाते.
स्वच्छ धुवून घेतलेले कपडे कधीही थेट सूर्यप्रकाश येणाऱ्या ठिकाणी सुकण्यासाठी घालू नये. यामुळे कपड्यांचा रंग फिका पडतो. चिकनकारी ड्रेस सुकवताना सगळ्यात आधी टॉवेल पसरवून त्याच्यावर ड्रेस सुकण्यासाठी घालावा.
चिकनकारी कपड्यांची इस्त्री नेहमी आतील बाजूने करावी. बाहेरील बाजूने इस्त्री केल्यास ड्रेस खराब होण्याची शक्यता असते. तसेच ड्रेसच्या एम्ब्रॉयडरीवर इस्त्री करताना वरती रुमाल ठेवून मगच इस्त्री करावी.