सर्वच महिलांचा जिव्हाळयाचा विषय म्हणजे पैठणी साडी. सर्वच महिलांना पैठणी साडी नेसायला खूप जास्त आवडते. पैठणी साडीवर चमक आणि आकर्षक डिझाईन साडी खरेदी करण्यास भाग पाडतात. सणावाराच्या दिवशी महिला रॉयल आणि स्टायलिश लुकसाठी पैठणी साडी खरेदी करतात. पण घाईगडबीमध्ये साडी करताना पैठणी साडी अस्सल आहे की नाही याची पाहणी केली जात नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हातमागावर विणलेली पैठणी साडी ओळखण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही पैठणी साडी ओळखू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
हातमागावरील अस्सल पैठणीची कशी कराल पारख! शुद्ध पैठणीची ओळख पटवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

पैठणी साडीवर करण्यात आलेले बुट्टीचे नक्षीकाम अस्सल साडीवर दोन्ही बाजूने सारखेच असते. साडीच्या दोन्ही बाजूने एकसारख्याच छटा असतात.

ओरिजनल पैठणी साडीच्या पदरावर मोर, पोपट, कमळ यांसारखे पारंपारीक कलात्मक डिजाईन्स अतिशय बारीक विणलेले असतात. संपूर्ण साडीवर नाजूक साजूक नक्षीकाम केले जाते.

पारंपरिक आणि हातमागावर विणलेली पैठणी साडी वजनाने थोडीशी जड असते. तसेच पैठणी साडीचा पोत अतिशय सॉफ्ट असतो.

शुद्ध रेशमी धाग्यांचा वापर करून विणण्यात आलेली पैठणी साडी मशीनवरील साडीपेक्षा अतिशय वेगळी असते. मशीनवर बनवण्यात आलेली पैठणी साडी तुम्ही सहज ओळखू शकता.

महाराष्ट्रातील येवला, पैठणमध्ये ओरिजनल पैठणी साडी मिळते. या भागांमध्ये पैठणी साडी विणण्याचे क्रेंद्र आहेत. तसेच हातमागावर विणलेली पैठणी साडी कधीही काळी पडत नाही. वर्षानुवर्षे साडीची चमक कायम जशीच्या तशीच राहते.






