सर्वच महिलांना साडी नेसायला खूप आवडते.महिलांच्या कपाटात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात. त्यात प्रामुख्याने दिसून येणारी साडी म्हणजे रेशमी साडी. या साडीला बाजारात मोठी मागणी आहे. रेशमी साड्या नेसल्यानंतर अंगावर चापून चोपून बसतात. रेशमी साडीवर करण्यात आलेले सुंदर रेशमाचे नक्षीकाम हीच या साडीची ओळख आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रेशमी साडीचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तुमच्या साडीचे सौंदर्य अधिककाळ टिकून राहील. (फोटो सौजन्य-pinterest)
रेशमी साडीचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

साडीचा रंग जाऊ नये म्हणून साडी धुतल्यावर उन्हात टाकू नका. सूर्यप्रकाशामुळे साडीच्या रंगाचे नुकसान होते. त्यामुळे ओली साडी सुकण्यासाठी सावलीत टाकावी.

रेशमी साडीची इस्त्री टेबलवर जाड चादर अंथरूण करावी. पातळ चादरीवर इस्त्री केल्यास साडी खराब होण्याची शक्यता असते.

उच्च तापमानात साडीला इस्त्री केल्यास किंवा सुकत घालत्यास साडीची गुणवत्ता खराब होऊन जाते.

बाजारात साडी ठेवण्यासाठी साडी कव्हर उपलब्ध असतात त्यामुळे रेशमी किंवा इतर साड्या ठेवताना साडी क्वहरचा वापर करावा.

रेशमी साडी वापरताना योग्य पद्धतीने वापरावी, अन्यथा साडी खराब होऊ शकते. साडीची गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी साडी घरी न धुवता ड्राय क्लिनिंगसाठी द्यावी.






