लग्न सोहळ्यात दागिन्यांसोबतच वरमाला सुद्धा आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतात. फॅशनच्या युगात अनेक गोष्टींमध्ये नवनवीन बदल होत आहेत. पूर्वीच्या काळी पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या झेंडूच्या फुलांपासून बनवलेला हार लग्नात वधूवरांच्या गळ्यात घालण्याची परंपरा होतो. पण हल्ली बेबी पिंक, पीच आणि व्हाईट रंगाच्या गुलाब आणि कार्नेशन फुलांच्या वरमाला सगळीकडे लोकप्रिय झाल्या आहेत. लग्नातील कपड्यांना मॅच होतील अशा वरमाला बनवून घेतल्या जातात. चला तर पाहुयात वरमालाच्या काही लेटेस्ट डिझाईन. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नात वधूवरासाठी असायला हवेत 'या' डिझाईनचे पारंपरिक मॉर्डन हार

लेहेंगा किंवा लग्नातील कॉन्ट्रास्ट साडीवरील लूकवर पांढऱ्या फुलांच्या वरमाला तुम्ही निवडू शकता. पांढऱ्या फुलांच्या वरमाला डार्क रंगांच्या कपड्यांवर उठावदार दिसतात.

सुवासिक मोगऱ्याच्या कळ्या आणि लाल गुलाबांचे कॉम्बिनेशन्स करून या पद्धतीने सुंदर वरमाला कस्टमाईज करून घेऊ शकता. लग्नातील वरमालांपासून सुंदर वोलपीस सुद्धा बनवले जाते.

साऊथ इंडियन लग्न सोहळ्यांमध्ये पानांच्या वरमाला वधूवराच्या गळ्यात घातल्या जातात. यासोबतच कमळाच्या फुलांच्या वरमाला सुद्धा अतिशय सुंदर दिसतात.

अनेकांना गुलाबाच्या मोठ्या फुलांपासून बनवलेल्या वरमाला आवडतात. लाल गुलाबाच्या वरमाला कोणत्याही लुकवर उठावदार दिसतात. यामध्ये रॉयल लुक दिसतो.

काहींना पारंपरिक पोशाखावर जुन्या स्टाईलचा वरमाला हव्या असतात. पांढऱ्या रंगाच्या फुलांचा वापर करून बनवलेल्या वरमाला अतिशय सुंदर दिसतात.






