कामाच्या धधावपळीमध्ये लहान मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना भूक लागल्यानंतर काहींना काही खाण्यास दिले जाते. मुलांना विकतचे पॅकबंद पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण वारंवार तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. लहान मुलांना कायमच विकतचे पॅकबंद पदार्थ खाण्यास देऊ नये. या पदार्थांमध्ये असलेल्या खूप जास्त मीठ आणि इतर घटकांचा वापर केला जातो, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांना भूक लागल्यानंतर कोणते पदार्थ खाण्यास द्यावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
पॅकबंद स्नॅक्स खाणे कायमचे जाल विसरून! लहान मुलांसाठी झटपट बनवा 'हे' चविष्ट पदार्थ
सर्वच लहान मुलांना सँडविच खायला खूप जास्त आवडते. वेगवेगळ्या भाज्या, ब्रेड, चीज आणि चटण्यांचा वापर करून बनवलेले सँडविच चवीला अतिशय सुंदर लागते. हा पदार्थ घाईगडबडीच्या वेळी झटपट तयार होतो.
सकाळच्या नाश्त्यासाठी मुगाच्या डाळीचा चिल्ला अतिशय उत्तम पर्याय आहे. चिल्ला तुम्ही हिरवी चटणी आणि सॉस सोबत खाऊ शकता. मुगाची डाळ हाडांसाठी आणि स्नायूंसाठी अतिशय प्रभावी ठरेल.
फळे खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. फळांमध्ये असलेले पोषक घटक शरीराची ऊर्जा वाढवतात, यासोबतच शरीर कायमच हायड्रेट ठेवतात. सकाळच्या नाश्त्यात फळांचे सॅलड बनवून खावे.
लहान मुलांच्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे पनीर. पनीरपासून बनवलेले पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतात. पनीर टिक्का, पनीर रोल किंवा पनीर कबाब बनवून तुम्ही मुलांना खाण्यास देऊ शकता.
ओट्समध्ये भरपूर फायबर आढळून येते. त्यामुळे वेगवेगळ्या भाज्या आणि ओट्सचा वापर करून बनवलेले कबाब चवीला अतिशय सुंदर लागतात. हे कबाब लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता.