बऱ्याचदा आहारात होणाऱ्या बदलांमुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. सतत तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवा केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे वारंवार गॅस, ऍसिडिटी, अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र असे न करता आहारात पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. पुदिन्याची पाने आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि पचन सुधारणारे घटक पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पुदिन्याच्या पानांचे कशा प्रकारे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
पोटात वारंवार गॅस होतो? मग आहारात करा 'या' हिरव्या पानांचे सेवन
अपचनाची समस्या वाढल्यानंतर पोटात जडपणा वाटू लागतो. यासाठी पुदिन्याचा रस काढून त्यात काळे मीठ टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण जेवण्याआधी घेतल्यास अपचनाची समस्या दूर होईल.
शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी आहारात पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. यासाठी तुम्ही पुदिन्याच्या पानांचे सरबत किंवा पुदिन्याच्या पानांचा रस बनवून तुम्ही पिऊ शकता.
वारंवार तुम्हाला जर अपचन किंवा मळमळ होत असेल तर पुदिन्याच्या पानांचा रस घेऊन त्यात आलं आणि लिंबाचा रस एकत्र मिक्स करून प्यायल्यास नैसर्गिक रित्या भूक वाढण्यास मदत होईल.
पोटात वाढलेला गॅस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात पुदिन्याच्या पानांचा चहा बनवून प्यावा. उकळत्या गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून उकळवून घ्यावी. त्यानंतर पाण्यात मध टाकून सेवन केल्यास ऍसिडिटीची समस्या कमी होईल.
आतड्यांमधील वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी आहारात पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. यासाठी पुदिन्याचे तेल कोमट पाण्यात टाकून सेवन करावे. यामुळे आतड्यांमधील वेदना कमी होतील.