बिग बाॅस मराठीचा पाचवा सिजन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या सिजनमधील अनेक कलाकारांनी बिग बाॅसचा हा पाचवा सिजन गाजवला. यातीलच एक म्हणजे घनश्याम दरोडे. आपल्या व्यक्तीमत्त्वाने त्याने अनेकांची मने जिंकली. त्याला सर्वजण छोटा पुढारी या नावाने ओळखतात. तर छोटा पुढारी लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
बिग बॉसच्या घरातून थेट रुपेरी पडद्यावर, छोट्या पुढारीला मिळाला हा चित्रपट!
बिग बाॅस मराठी 5 मध्ये छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे चांगलाच चर्चेत राहिला. त्याचा चाहतावर्गदेखील आता वाढला आहे.
बिग बाॅस मराठी 5 मधून बाहेर पडताच त्याला एक मोठा चित्रपट मिळाला आहे. लवकरच आता तो चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे 'कर्मयोगी आबासाहेब' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मात्र या चित्रपटात घनश्याम नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार आहे, हे अद्याप समोर आले नाही. चाहते आता त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी फार उत्सुक झाले आहेत
"कर्मयोगी आबासाहेब" हा चित्रपट येत्या 25 ऑक्टोबरला मराठी आणि हिंदी भाषेत जगभर रिलीज होणार आहे.