वयात आल्यानंतर सुरु झालेल्या मासिकपाळीपासून ते मेनोपॉजपर्यंत स्त्रियांना प्रत्येक महिन्यात शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं. रोजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातही चुकीचे बदल होत गेले आहेत. याचा परिणाम हा स्त्रियांच्या गर्भाशयावर होताना दिसून येत आहे. यामुळे लहान वयातच लवकर मासिक पाळी येते आणि ऐन चाळीशीच्या आसपास महिलांना मेनोपॉज होण्याची समस्या होत आहे.
पीसीओडी आणि पीसीओएस या समस्येवर अनेक महागड्या ट्रीटमेंट करुनही पाहिजे तशी तब्येतीत सुधारणा होत नाही.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मासिकपाळीतील अतिरिक्त रक्तस्त्राव असो किंवा लवकर येणारा मेनोपॉज औषधं गोळ्यांबरोबरच आहारातही विशेष बदल करणं महत्त्वाचं आहे.
योग्य आहार आणि व्य़ायाम या बरोबरचं फळाचं सेवन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मासिकपाळीच्या त्रासामुळे शरीरात रक्ताची कमतरता मोठ्या प्नमाणात जाणवायला लागते. यामुळे सतत थकवा येणं, श्वास घेताना त्रास होणं या समस्या निर्माण होतात.
यावर आयुर्देवात सांगितल्याप्रमाणे डाळींबाचं सेवन करणं. हे फळं शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यासाठी फायदेशीर आहेचं. त्याचबरोबर, मासिकपाळीच्या त्रासावर देखील अतिशय गुणकारी आहे.
डाळिंबामध्ये फाइटोएस्ट्रोजेन्स (Phytoestrogens) असतात, जे नैसर्गिक हार्मोन्ससारखे वागून हार्मोनल असंतुलन टाळण्यास मदत करतात.
मासिक पाळीच्या काळात काही महिलांना अपचन किंवा गॅस्ट्रिक त्रास होतो. डाळिंबाचे रस किंवा दाणे पचन सुधारण्यास मदत करतात.मासिकपाळीतील हार्मोन्स संतुलित ठेवण्यास डाळींब मदत करते.