सर्वच महिलांना सोन्याचे दागिने घालायला खूप आवडतात. सोन्याचे दागिने कानामध्ये, हातामध्ये, गळ्यात घातल्यानंतर सुंदर दिसतात. सर्वच महिलांना कानामध्ये सोन्याचे कानातले घालायला खूप आवडतात. त्यामध्ये महिला कानात झुमके, डायमंड किंवा मोत्याचे दागिने घालतात. त्यातील सर्व महिलांना आवडणारे कानातले म्हणजे झुमके. झुमके साडी किंवा ड्रेसवर घातल्यानंतर सुंदर दिसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोन्याच्या झुमक्यांच्या काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाइन्स नक्की ट्राय करून पहा.(फोटो सौजन्य-pinterest)
सोन्याच्या झुमक्यांच्या नवीन डिझाइन्स

गोलाकार डिझाईनचे सुंदर झुमके कानात घातल्यानंतर सुंदर दिसतात. त्यामुळे तुम्हाला जर नाजूक साजूक डिझाईनचे झुमके हवे असतील तर तुम्ही या डिझाईनचे झुमके घालू शकता.

पैठणी साडी नेसल्यानंतर तुम्ही या डिझाईनचे झुमके घालू शकता. ही डिझाईन कानात घातल्यानंतर खूप उठावदार आणि सुंदर दिसते.

इतरांपेक्षा वेगळी डिझाईन जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या डिझाईनचे झुमके घालू शकता. वेगळ्या आकाराचे झुमके कानामध्ये घातल्यानंतर सुंदर आणि उठावदार लुक दिसतो.

झुमका कानातल्यांमध्ये अनेक नवनवीन डिझाइन्स उपलब्ध झाल्या आहेत. तुम्ही वेगवेगळ्या रंगाचा वापर करून तयार केलेले झुमके सुद्धा परिधान करू शकता.

तुम्हाला जर मोठ्या आकाराचे झुमके हवे असतील तर तुम्ही या डिझाईनचे झुमके बनवू शकता. ही डिझाईन कोणत्याही साडीवर सूट होईल.






