US Trade Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांचा 'टॅरिफ वॉर'चा इशारा; भारतासह अनेक देशांवर ‘Unfair Trade’ ची चौकशी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
यापूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे शुल्क (Tariff) रद्द केले होते. परंतु ट्रम्प सरकार आता यासाठी नवी पर्यायांचा शोध घेत आहे. यामुळे व्यापार तणाव वाढण्याची शक्यता आहे.
ट्रम्प सरकारने सध्या दोन आघाड्यांवर व्यापारी भागीदारांची चौकशी सुरु केली आहे.
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीन यांनी म्हटले आहे की, अमेरिकन नोकऱ्यांचे रक्षण करण्याची गरज आहे. यामुळे व्यापारी भागीदांसोबत निष्पक्ष व्यापार सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. समस्येच निराकरण करण्यासाठी शुल्क लागू करावे लागले तर ट्रम्प प्रशासन मागे हटणार नाही असे ग्रीर यांनी म्हटले आहे.
हा निर्णय अशी वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एप्रिलमध्ये बीजिंगमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. सध्या याची तयारी सुरु आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक व्यापारात तणाव निर्माण होण्याची शक्यात आहे.
Ans: ट्रम्प सरकार भारतासह, चीन, युरोपियन युनियन, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, आणि व्हिएतनाम या प्रमुख देशांविरोधात व्यापार चौकशी सुरु केली आहे. तसेच यामध्ये तैवान, जपान, थायलंड, मलेशिया, कंबोडिया, सिंगापूर, इंडोनेशिया, बांगलादेश, स्वित्झर्लंड आणि नॉर्वे या देशांचाही समावेश आहे,
Ans: ट्रम्प सरकारच्या मते, काही देशांची व्यापार धोरणे अन्यायकारक आहेत. अनेक राष्ट्रांमध्ये त्यांच्या औद्योगिक क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात उत्पादन होत आहे. या वस्तू अमेरिकेत स्वस्त दराता विकल्या जात आहे. यामुळे ही चौकशी सुरु करण्यात आली आहे.






